माय

माय

कविता जरी मी
केल्या असतील तरी
त्यातील शब्द तूच होतीस
मी फक्त निमित्य होतो
कर्ता मात्र तूच होतीस

मी जरी जगात असलो
तरी श्वास तूच होतीस
मी फक्त निमित्य होतो
कर्ता मात्र तूच होतीस

मी जरी शिकत असलो
तरी प्रेरणाशक्ती तूच होतीस
मी फक्त निमित्य होतो
कर्ता मात्र तूच होतीस

फक्त माझे शरीर होते
आत्मा हि तूच होती
मी फक्त निमित्य होतो
कर्ता मात्र तूच होतीस

– राहुल शिवाजी बेदरकर

Post a Comment

You must be logged in to post a comment.
%d bloggers like this: