कविता

कविता
माझ नाव कविता. आज ६ वर्षापासून चार भिंतीच्या भयानक कैदेत आहे. मी एक वैश्या आहे. धक्का बसला का ? आणखी अनेक धक्के बसणार आहेत.

मी एका छोट्या राज्यातील , एका छोट्या खेड्यात जन्माला आलेली माझ्या आई-बाबाची लाडकी मुल होते.

मला चांगल आठवतय आमची काय परिस्तिथी होती. ४ एक्कर शेती होती, कि त्याच्यात कधीहि काही येत नसे. सर्व डोंगराळ  प्रदेश होता. बापान बऱ्याचदा कर्ज घेऊन नशीब सोबत जणू सट्टाच खेळला  होता.
कर्जाचे भार इतके वाढले होते कि, एक दिवस घरातील आहे नव्हत तेवड समान ते लोकं घेऊन गेले.

याच धस्कीने व अपमानाने माझ्या बापाने आत्महत्या केली. आता आमच्या घरात मी, आई व सतत बिमार असलेली आजी राहिलो होतो.

सरकारी दवाखान्यात कधी औषधे नव्हती तर कधी  डॉक्टर पैसे माघायाचा. त्यामुळे ती तसीच गेली.

थोडे पार पैसे कमवावे म्हणून मी काम करावे असे वाटले. पण खेड्यात काय काम मिळणार. कारण सर्वांचीच अशी परिस्तिथी होती.
दर दोन दिवसाला कोणी न कोणी आत्महत्या करत होत.

गावातल्या एका माणसाने शहरात काम लाऊन देतो म्हणून नेले व या कामाला लावले. काही दिवस घरी पैसे पाठवले. पण आता पाठवत नाही.
मला माहित नाही माझी आई जिवंत आहे का नाही. मी कधी घरी गेले नाही, व तिला बोलले नाही.

आता हेत माझे जीवन आहे.

लोकं माझ्या बद्दल खूप काही बोलतात पण माझी परिस्तिथी त्यांना माहित नाही.

असो कोणाला काय फरक पडतो ?

Post a Comment

You must be logged in to post a comment.
%d bloggers like this: