मी भगतसिंग बोलतोय

bs

मी भगतसिंग बोलतोय

आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली आहेत तरीहि मी आजीवन कैदेची शिक्षा भोगत आहे. तू म्हणत असशील मला तर २३ मार्च १९३९ रोजीच फाशीची शिक्षा झाली होती मग मी कशाची शिक्षा भोगत आहे.

तुला आठवलाय का मला शिक्षा देताना मी मिंडल्तन काय म्हणाला होता कि ” त्याच्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार होण थांबवण्यासाठी मी त्याला आजीवन कैदेची शिक्षा सुनवत आहे.”

स्वातंत्र्यानंतर हि शासकवर्गाने कायम माझे विचार दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून हि कोणाला स्वातंत्र्य मिळाले आहे का ?

कोण आजाद हुवा ?
किसके माथे से गुलामी की सियाही छुटी हैं ?
मेरे सीनेमें अभी दर्द हैं महकूमी का …
मादरे – हिंद के चेहरे पे उदासी हैं वही
कोण आजाद हुवा ?

भारत देश साम्राज्यवादाच्या जोखडाखाली पिचत आहे. कष्टकरी वर्गाचे आज भयानक हाल होत आहेत त्यांच्या पुढे दोन संकट आहेत – परकीय आणी देशांतर्गत भांडवल्याच्या हल्याची ते दोघे हि हातमिळवणी करून हल्ला करीत आहेत.

आजच्या देशाच्या परिस्थितीचा विचार कर सरकार सर्व प्रकारच्या कल्याणकारी सुविधा काढून घेत आहेत. सरकारी इस्पितळ महाग झाल्याने आता गरिबांना तडफडत मारण्या वाचून पर्याय उरला नाही. चांगला आभ्यास करून इंजिनिअर किंवा डॉक्टर बनण्याची स्वप्न आजचा गरीब विद्यार्थी पाहू शकत नाही. सरकारी कॉलेजमध्येही मोढ्या प्रमाणात फीस वाढ झाली आहे. शिक्षण संस्था लाखो रुपये देउ शकणाऱ्या अनिवासी भारतीया पुढे लाळ घोटात आहेत.

दुसरीकडे बेकारीने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. रिकाम्या जागा भरण तर सोडाच, उलट मोढ्या प्रमाणात नोकर कपात होत आहे. छोटे उदोग बंद पाडत आहेत. शेती मालाला भाव नाही . येणारा प्रत्येक दिवस नवे संकट घेऊन येत आहे. आणी केवळ कसेबसे जगत राहणाऱ्या आंतरिक इच्छेने फक्त माणूस जगत आहे.

हे सार का होतयं ? कोण करतय ? याचा तू विचार करतोस का ? का करणार तू ? कारण तू स्वतःच्या फायद्यासाठी जगतो आहेस. मला माहित नाही तू कोण आहेस आणी काय करतोस ? तू डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक किवा आणखी कोणी असील . पण प्रत्येकजन समाजापासून मिळवलेल्या शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करतो आहे.

मित्रांनो, आज माझ्या बलिदानाला ८० वर्षे होत आली, भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली. आणी आज पुन्हा एकदा आपला देश गुलामीमध्ये ढकलला गेल्याच दिसत आहे. हे कृष्णकृत्य करणारे आपल्या देशाचेच सताधारी आहेत. आपल्या स्वर्थासाठी त्यांनी देश्याच्या अस्मितेचा लिलाव केला. १०० कोटीहून अधिक लोकसंखेचा, हजारो वर्षाची समृद्ध परंपरा असणारा, क्रांतिकारी विचारांचा वारसा लाभलेला. देश साम्राज्यवादी देशांनी आणी त्यांच्या बहुराष्ट्र कंपन्यांनी कवडीमोल किमतीत विकत घेतला आहे.

माझं स्वप्न, कोट्यावधी भारतियांच स्वप्न धुळीला मिळाल . म्हणूनच मी तुला बोलतोय. कारण मला खात्री आहे कि तू हा बदल घडवून आणू शकतोस.

मुळापासून क्रांतिकारी बदल केल्या खेरीज हि परिस्थिती बदलणार नाही. त्यांना संपूर्ण उखडून टाकण्यासाठी खूप मोठी ताकद गोळा करायला हवी.

संघटीत ताकद ! संघटीत व्हा !

त्यासाठी तूला माझ्या क्रांतिकारी विचारांची गरज आहे. व परिस्थितीचा आभ्यासहि करावा लागेल. आणी सर्वांसाठी लढाव लागेल.
तू एकता नाही आहेस, तुझ्याबरोबर अनेक लोग आहेत. जरा डोळे उघडे करून पहा. माझे हे मनोगत तू तुझ्या मित्रान पर्यंत पोहोचवशील अशी मला अपेक्षा आहे.
तरच मी आजीवन कैद मधून माझी सुटका झाली असे समजेल.

Advertisements

3 Comments

 1. BhagatSingh
  Posted April 13, 2011 at 4:46 am | Permalink

  Superlike !!

 2. DEVIDAS PADALWAR
  Posted July 19, 2011 at 3:07 am | Permalink

  THIS POST IS VERY EXCELLENT .I LIKE TO READ IT

 3. Anupam
  Posted March 18, 2013 at 10:54 pm | Permalink

  good one Rahul…keep on writing 🙂 !!!!


Post a Comment

You must be logged in to post a comment.
%d bloggers like this: