माझ काय चुकलं ?

माझ काय चुकलं ?
मी आज फार थकलोय, मला जगण्याचा कंटाळा आला आहे. तुम्हाला माही आहे माझ्या सोबत काय झाले ?

चार चौघात बसलो कि लोक मला म्हणतात  मी अमुक  जातीचा  आहे, तू  आमच्या सोबत राहू नकोस, तुला इंग्लिश
बोलता येत नाही, तुझ्या कडे चांगले कपडे नाहीत, तू गरीब आहेस.

मी अमुक जातीत जन्माला आलो, माझ काय चुकलं ? माझ्या बाबाकडे इंग्लिश माध्माच्या शाळेत घालण्यासाठी  पैसे नव्हते, माझ काय चुकलं ?
चांगले कपडे विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे  नव्हते, माझ काय चुकल ? माझ्या कडे मेजवान्या देण्यासाठी पैसे नाहीत, माझ काय चुकलं ?

का आहे एवढी असमानता ? निसर्ग तर माझ्यासोबत असा व्यवहार करत नाही, मंग हि लोक का असा व्यवहार करत आहेत माझ्यासोबत !
त्याने तर कोणालाही असमानतेची वागणूक दिली नाही. मंग इतर गोष्टी मध्ये हि असमानता का आहे ?

सूर्याचा प्रकाश सर्न्वासाठी समान आहे, वारा समान आहे, पाणी समान आहे. मंग इतर गोष्टी मध्ये हि असमानता का आहे ?

याचे कारण काय आहे, हे समजून घेयला हवे, असे वाटते का तुम्हाला ?

माणूस जोपर्यंत पैसा जीवनाचा  केंद्र बिंदू म्हणून समजत राहील, आणी त्यासाठी जिथे तिथे स्वार्थ पाहत राहील व त्या केंद्र बिंदू भोवती फिरत राहील
तो पर्यंत हे असेच होत राहील. कुठे तरी हे असे थांबवावे लागेल. का कोणी असा विचार करत नाही कि, आता मला २५००० पगार मिळतो, मग मी आता यापेक्ष्या जास्त पगाराच्या नौकरीच्या  मागे जाणार नाही. कारण २५००० मध्ये माझ सर्व भागते, आता मला जास्त पैश्याची गरज नाही.  कोणीही असा विचार करणार नाही कारण, प्रत्येकाला जास्तीस जास्त पैसा कमवायचा आहे. याचे कारण काय आहे? हे ही समजावून घेणे आवश्यक आहे.

आता भारत देश का धनिकाचा देश आहे. हातावर मोजण्या इतके धनिक लोक आहेत. काही मध्यम वर्गीय आहेत. आणी बाकी सर्व लोक गरीब आहेत.

समाजाचे प्रमुख अंग असूनही कामगारांना त्याच्या प्राथमिक हक्कापासून वंचित केले ठेवले आहे. दुसऱ्यांचे अन्नदाते असणारे शेतकरी आज एकेका  दाण्यासाठी गरजवंत बनले आहे.  जगभरच्या बाजारपेठेसाठी कपडे उपलब्ध करून विणकरांना आपले व  पोराबाळाचे शरीर झाकण्या इतके देखील कपडे नाहीत.
सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार, स्वतः मात्र घाणयेरड्या  झोपड्यात राहून आपली जीवनलीला समाप्त करतात.

या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार छोट्यामोठ्या  कारणासाठी लाखो लोकांचे नसीब उलटे पालटे करू लागतात.

हि भयानक विषमता आणी जबरदस्तीने लादली गेलेला भेदभाव जगाला एक महाभयंकर प्रल्याकडे खेचून नेत आहे.  हि स्थिथी अधिक काळ टिकून राहणे शक्य नाही.
आता गरज आहे क्रांतीची म्हणजे आन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस्थेत आमुलाग्र बदल !
तर चला मग तैयार आहात ?

Advertisements

Post a Comment

You must be logged in to post a comment.
%d bloggers like this: